Ad will apear here
Next
‘फिक्की फ्लो’कडून ५० युवतींना कौशल्य प्रशिक्षण
२५ जणींना नोकरीचा लाभ
प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमाप्रसंगी प्रशिक्षणार्थी युवतींसह रितु छाब्रिया, अनीता सणस, अनिता अग्रवाल, अजय सेवेकरी, पराग जैन, ब्रिजस्टोनचे रानू कुलश्रेष्ठ आदी मान्यवर

पुणे : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशन अर्थात ‘फिक्की फ्लो’ संस्थेच्या वतीने ब्रिजस्टोन, टाटा स्ट्राइव्ह यांच्या सहकार्याने ५० युवतींना रिटेल सेल्स असिस्टंट कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी २५ मुलींना नोकरीही मिळाली आहे. 

या प्रशिक्षण उपक्रमांतर्गत रिटेल मॅनेजमेंटमधील प्रशिक्षणासाठी गेल्या वर्षीपासून भरघोस निधीची तरतूद केली जात आहे. या अभ्यासक्रमात सर्व सहभागी मुलींना विविध विषयांचे धडे देण्यात आले. नऊ आठवड्यांचे क्लासरूम प्रशिक्षण व एका आठवड्याचे प्रत्यक्ष नोकरीचे प्रशिक्षण देण्यात आले. रिटेल स्टोअर आणि मर्चंडाइज डोमेन याचे प्रशिक्षण दिले गेले. व्यावसायिक विकासाबद्दल मार्गदर्शन, सॉफ्टस्किल, संवादकौशल्य, अर्थसाक्षरता आदी गोष्टींचाही या प्रशिक्षणामध्ये समावेश होता. प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी त्यांना दुकानात काम करण्याची संधीही देण्यात आली. यातील २५ युवतींना वेगवेगळ्या रिटेल स्टोअर्समध्ये नोकरी मिळाली असून, उर्वरित २५ जणींना सहा आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी दिली जाणार आहे. 


प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवतींना दापोडी येथील टाटा स्ट्राइव्ह व्यावसायिक केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला ‘फिक्की फ्लो’च्या चेअरपर्सन रितु छाब्रिया, वरिष्ठ उपाध्यक्ष अनीता सणस, कोषाध्यक्ष अनिता अग्रवाल, अजय सेवेकरी, पराग जैन, ब्रिजस्टोनचे रानू कुलश्रेष्ठ, टाटा स्ट्राइव्हचे सदस्य उपस्थित होते. 

महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याचे काम ‘फिक्की फ्लो’च्या माध्यमातून केले जाते. यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, त्या माध्यमातून हजारो युवतींना प्रशिक्षण दिले जात आहे. महिलांना पुरुषांइतक्याच संधी मिळाव्यात, या दृष्टीने ‘फिक्की फ्लो’ आणि ब्रिजस्टोन प्रयत्नशील आहे. त्यासाठी सीएसआर निधीमधून विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले आहे.

‘‘फिक्की फ्लो’ पुणे चॅप्टरने गेल्या पाच वर्षांत ४६२ सदस्य जोडत महिलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. ‘शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक सेवा, आदी उपक्रम सुरू आहेत,’ असे रितू छाब्रिया यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZTVCF
Similar Posts
महिला सक्षमीकरणासाठी ‘फ्लो हाफ मॅरेथॉन’ पुणे : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज लेडीज ऑर्गनायजेशन अर्थात ‘फिक्की फ्लो’च्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी येत्या डिसेंबरमध्ये ‘फ्लो हाफ मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉनसाठी फिक्की फ्लो आणि ब्रिजस्टोन यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
राज्यातील पहिला महिला संचालित दुग्ध व्यवसाय मावळमध्ये सुरू मावळ : संपूर्णपणे महिलांनी चालविलेला महाराष्ट्रातील पहिला दुग्ध व्यवसाय पुणे जिह्यातील मावळ तालुक्यात सुरू झाला आहे. टाटा पॉवरच्या सहकार्याने येथील महिलांनी मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनी स्थापन केली असून, याद्वारे सर्वसामान्य शेतकरी ते कृषी उद्योजिका असा मोठा टप्पा या महिलांनी पार केला आहे
‘महिलांचं मानसिक सक्षमीकरणही अत्यंत आवश्यक’ ‘महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक गोष्टींवर जास्त भर दिला जातो. परंतु महिलांचं मानसिक सक्षमीकरणही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याशिवाय त्या सक्षम बनू शकत नाहीत,’ असे पुण्यातील मानसशास्त्रज्ञ आणि कॉर्पोरेट ट्रेनर दीप्ती पन्हाळकर यांना वाटते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पन्हाळकर यांची मुलाखत
नेक्टर टाउन फाउंडेशनचे पुण्यात केंद्र सुरू पुणे : ओडिशास्थित व आर्थिक दुर्बल समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या नेक्टर टाउन फाउंडेशनने महाराष्ट्रात आपल्या कार्याचा विस्तार केला असून, पुण्यात आपले केंद्र सुरू केले आहे. कौशल्य आधारित प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून ही संस्था महिला सक्षमीकरणाचे कार्य करते. अंजू बन्सल या पुणे विभागाचे नेतृत्व करीत आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language